वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर आणि शेगाव तालुक्याचा समावेश असलेल्या जळगाव जामोद मतदार संघात भाजप नेते आणि बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांचे प्राबल्य आहे ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - बाळापूर मतदारसंघावर १९६१ ते १९८५ पर्यंत काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. १९९0 च्या निवडणुकीत भाजपचे किसनराव राऊत यांनी पहिल्यांदा या मतदारसंघात कमळ फुलविले. ...
लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने पहिल्यांदाच प्रस्थापितांच्या मुळाला हात घातला. बहुजन समाजाची सत्तासंपादनाची ही झेप लक्षात आल्यानेच प्रस्थापित राजकीय नेते शिवसेना-भाजपमध्ये उड्या मारीत आहेत. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : जागा वाटपाबाबत एमआयएम समाधानी नसल्यामुळे स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेत असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केले होते. ...