वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
सामाजिक समतोल कायम राखण्यासाठी आणि जनतेच्या भावना लक्षात घेऊन केंद्र शासनाने तात्काळ कायदा मागे घ्यावा, असे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले. ...
पोलीस अधिक्षकांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. संभाजी भिडे यांच्या बचावासाठी आधी माजी गृहमंत्री आर.आर. पाटील होते. आता जयंत पाटील त्यांचा बचाव करतात, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. ...
देशात लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयक, राष्ट्रीय नागरिक नोंदणी, वाढती महागाई याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. ...