वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
अकोल्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता हळूहळू रंग धरत आहे. मतदारांचा कानोसा अन् राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला तर अकोल्यातील भाजपा सध्या ‘हवेत’ असल्याचे स्पष्ट होते. ...
एकेकाळी हिंगोली लोकसभा मतदारसंघात भारिपचे माधवराव नाईक यांच्याशीच प्रमुख उमेदवाराची टक्कर असायची. मात्र त्यांनाही कधी जिंकता आले नाही. मात्र ते वैभव लयाला गेले अन् उभारी घेण्याइतपत दुसरे सक्षम नेतृत्वही मिळाले नाही. आता वंचित आघाडीचा प्रयोग काय साध् ...
सध्या या आघाडीचा उल्लेख बरीच मंडळी भाजपची ‘ब’ टीम असा करताना दिसतात; परंतु दूरगामी विचार केला तर यात तथ्य वाटत नाही याचा उलगडा येत्या वर्षभरात होईल. ...
सध्याच्या निवडणुकीत मात्र वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात असलेले बळीराम सिरस्कार यांचे प्रयत्न अपुरे पडत असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात आहे. ...
काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांनी संविधानाचा खून केल्याच्या टीकेला वंचित बहुजन आघाडीचे उत्तर ...