वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
Prakash Ambedkar News: नवरदेव तयार आहे, मुली पाहण्याचाही कार्यक्रम सुरू आहे. सध्या फक्त चहा-पाण्याच्या चर्चा सुरू आहेत. मुलगी पसंत पडली की लगीन लावू, अशी मिश्किल टिप्पणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...
अकोला महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार की स्वबळावर लढणार याबद्दलचा संभ्रम अजूनही कायम आहे. दोन्ही पक्षांकडून बोलणी सुरू असून वंचित काँग्रेससमोर जागावाटपाचा फॉर्म्युला ठेवला आहे. ...
नगरपरिषदांसाठी वंचितने काँग्रेसपुढे समसमान जागांचा प्रस्ताव ठेवला होता. जागावाटपाचे हेच ५०-५० सूत्र वंचित मुंबई महापालिकेसाठीही कायम ठेवू शकतो, असे म्हटले जाते. ...
Nagpur : वंचित बहुजन आघाडीने नागपूर महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी वाटचाल सुरू केली आहे. काँग्रेसने नगर परिषद निवडणुकीत आघाडीचा प्रस्ताव देऊनही प्रतिसाद दिला नाही. ...
Prakash Ambedkar News: एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासारख्या माणसाला खिशात घातले आहे. एकनाथ शिंदे यांनी आपली पॉवर दाखवून दिली. हीच त्यांची किमया आहे. ...