महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
सध्या राज्यात भेसळखोरांना पकडण्याची मोहीम राबवली जात आहे. भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थात सहभागी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, शिवाय असे दूध स्वीकारणाऱ्यांनाही सहआरोपी करण्याचे आदेश दिले आहेत. ...
राज्यात लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण ७३ टक्के करण्यात आले आहे. उर्वरित लसीकरण ७ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. ...
Maharashtra IAS Transfer: राज्य सरकारनं मंगळवारी १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. तसंच तुकाराम मुंढे यांच्याकडेही नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ...