महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींसंदर्भात दक्ष राहणे गरजेचे आहे. कोरोनामुळे नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. अशात लवकरच सुरू होणाऱ्या पावसाळ्यामध्ये अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी दहाही झोनमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्या ...
राज्य शासनाने दिलेल्या आदेशाच्या अधीन राहून आज १४ मेपासून ऑनलाईन मद्यविक्रीला नागपुरातही परवानगी देण्यात आली आहे. परंतु यासाठी ग्राहकाजवळ मद्यपरवाना असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त लॉकडाऊनमध्ये काहीअंशी शिथिलता देण्यासंदर्भातील नवे आदेश महापालिका आयुक् ...
कोविड-१९ च्या दृष्टीने नागपूर शहरासाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या कालावधीत आपले नियंत्रण राहिले नाही तर पुढील १५ महिने असेच राहावे लागेल. त्यामुळे पोलिसांनो, प्रतिबंधित क्षेत्रामधील कुठलीही व्यक्ती बाहेर येणार नाही, असा बंदोबस्त करा आणि ...
नागपूर शहरात जीवनावश्यक वस्तूंसह निवासी संकुलातील आणि रहिवासी परिसरातील फक्त होजियरी आणि स्टेशनरी दुकाने, इन सीटू बांधकाम कार्य आणि १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यालये सुरू करण्याचा निर्णय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी घेतला ...
नागपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढीसाठी काही ‘हॉटस्पॉट’ कारणीभूत ठरले आहेत. शहरातून कोरोना हद्दपार करण्यासाठी आता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. ...
नागपूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या वाढत आहे. याचा विचार करता बधितांवर उपचार करण्यासाठी शहरातील १२ खासगी रुग्णालयांना २६ एप्रिलपर्यंत सज्ज राहण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. ...
नागपूर महानगरपालिका हद्दीतील गांधीबाग-महाल झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. १९ मधील भालदारपुरा परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात होऊ नये म्हणून नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता हा परिसर सील करण्याचे आदेश मनपा ...
एका रुग्णामुळे शहरात सुमारे १९९ जणांना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवायचा असेल, ही साखळी खंडित करण्यासाठी सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. ‘कोरोनाची साखळी कशी खंडित होणार?’ या विषयावर ‘फेसबु ...