दि. १ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात थंडी जाणवणार आहे. मुंबईसह कोकण व उर्वरित महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांत पहाटेचे किमान तापमान १४, तर दुपारचे कमाल तापमान २८ ते ३० म्हणजे दोन्हीही त्यांच्या सरासरी इतके किंवा त्यापेक्षा एखाद्या अंशाने कमी असू शकतात. ...
२३ जानेवारीपर्यंत नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, उत्तर सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान हे १०-१२ तर दुपारचे कमाल तापमान २६ अंश राहील. ...