lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > आज पूर्व विदर्भात दोन जिल्ह्यांत ऑरेंज तर ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट

आज पूर्व विदर्भात दोन जिल्ह्यांत ऑरेंज तर ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Orange alert in two districts and yellow alert in 6 districts in East Vidarbha today | आज पूर्व विदर्भात दोन जिल्ह्यांत ऑरेंज तर ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट

आज पूर्व विदर्भात दोन जिल्ह्यांत ऑरेंज तर ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट

बंगालच्या उपसागरावर ॲन्टी चक्राकार वारे घोंगावत असून विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यासह हलक्या व मध्यम ...

बंगालच्या उपसागरावर ॲन्टी चक्राकार वारे घोंगावत असून विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यासह हलक्या व मध्यम ...

शेअर :

Join us
Join usNext

बंगालच्या उपसागरावर ॲन्टी चक्राकार वारे घोंगावत असून विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यासह हलक्या व मध्यम सरींचा पाऊस होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामानाने वर्तवले आहे.पुढील दोन दिवसही विदर्भात पावसाची शक्यता असून गारपीटीचाही अंदाज देण्यात आला आहे.

विदर्भासह मराठवाड्यातही पाऊस व गारपीटीचा अंदाज देण्यात आला असून काल लातूरसह नांदेडला अलर्टही देण्यात आला होता. नांदेडमध्ये गारपीट झाली असून पिकांचे मोठे नुकसान झाले.

आज कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट

आज पूर्व विदर्भातील ६ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे.

अमरावती, यवतमाळ,वर्धा, नागपूर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत.

Web Title: Orange alert in two districts and yellow alert in 6 districts in East Vidarbha today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.