अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे. Read More
Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळ उत्तर भारताच्या दिशेने पुढे सरकत असून, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशातही यामुळे मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ...
पालघर, तसेच वसई-विरार शहराला या वादळाचा अधिक फटका बसला आहे. यात काही ठिकाणी पाणी साचले, 300 हुन अधिक झाडे उन्मळून पडली, मुख्य तसेच छोटे रस्तेदेखील बंद पडले. ...
अमृता फडणवीस यांनी शायरीतून चक्रावादळाचं वर्णन करताना, प्रश्न विचारला होता. त्यांच्या या शायरीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही शायरीतूनच उत्तर दिलं होतं. ...
तीव्रता घटली; गुजरातला धडकले त्यावेळी तौक्तेचे स्वरूप अतिशय तीव्र झाले होते. चक्रीवादाळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे गुजरातचे प्रशासन सामना करण्यासाठी सज्ज होते. ...