अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे. Read More
Tauktae Cyclone And Gateway of India : समुद्रात उसळलेल्या उंच लाटांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ वाहून आला होता. त्यामुळे महापालिकेच्या तब्बल शंभर कामगारांनी या परिसराची साफसफाई करीत दहा ट्रक कचरा साफ करण्यात आला. ...