Tamil Nadu Assembly Elections 2021 Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Tamil nadu assembly elections 2021, Latest Marathi News
देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामध्ये, तामिळनाडू विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तर, 2 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. Read More
आज होणार सुनावणी, रविवारी दुपारी झालेल्या विशेष सुनावणीत केरळ उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या याचिकांवर निवडणूक आयोगाला म्हणणे मांडण्यास सांगितले आहे ...
अण्णा द्रमुकच्या अल्पसंख्यांक विभागाचे नेते बशीर एके ठिकाणी बसून महिलांना प्रत्येकी ५०० रुपये वाटत असल्याचा हा व्हिडीओ आहे. हे ज्या चेपॉक मतदारसंघात घडले आहे, तेथून पूर्वी माजी मुख्यमंत्री व द्रमुकचे दिवंगत नेते एम. करुणानिधी निवडून येत. ...
अण्णा द्रमुकशी आघाडी केलेला एस. रामदास यांचा पीएमके या समुदायाचे नेतृत्व करीत आला आहे. पीएमके २३ जागा लढवीत असून, त्यातील बहुतांश जागा उत्तर तामिळनाडूतील आहेत. तिथे विरोधी पक्षांना विजयासाठी कसरत करावी लागेल. ...
अण्णा द्रमुकने वॉशिंग मशिन, सोलर कुकर मोफत देण्याबरोबरच प्रत्येकाला घर बांधून देण्याची घोषणा केली आहे. घरातील किमान एका व्यक्तीला सरकारी नोकरी मिळेल आणि शैक्षणिक कर्जाची रक्कम माफ केली जाईल, असे पक्षाने जाहीरनाम्यात म्हटले आहे. ...
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ४ टक्के मते मिळवणारा एनटीके द्रविडी आंदोलनाशी नाते सांगत असल्याने तो यंदा प्रमुख पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. तामिळ संस्कृती, तामिळ भाषा आणि त्यांची अस्मिता हा एकमेव अजेंडा घेऊन एनटीकेने जनतेला साद घातली आहे. ...