‘वणियार’ म्हणतील ती पूर्व; 30 मतदारसंघांत प्रभाव! आरक्षणामुळे अण्णा द्रमुककडे कल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 04:13 AM2021-03-19T04:13:50+5:302021-03-19T06:41:15+5:30

अण्णा द्रमुकशी आघाडी केलेला एस. रामदास यांचा पीएमके या समुदायाचे नेतृत्व करीत आला आहे. पीएमके २३ जागा लढवीत असून, त्यातील बहुतांश जागा उत्तर तामिळनाडूतील आहेत. तिथे विरोधी पक्षांना विजयासाठी कसरत करावी लागेल. 

‘Waniyar’ power in the 30 constituencies in tamil nadu | ‘वणियार’ म्हणतील ती पूर्व; 30 मतदारसंघांत प्रभाव! आरक्षणामुळे अण्णा द्रमुककडे कल

‘वणियार’ म्हणतील ती पूर्व; 30 मतदारसंघांत प्रभाव! आरक्षणामुळे अण्णा द्रमुककडे कल

googlenewsNext

पोपट पवार -

चेन्नई
: तामिळनाडूत द्रविडी राजकारणापासून चार हात दूर असलेला वणियार समाज आता महत्त्वाची भूमिका निभावू पाहतो आहे. धर्मपुरीसह उत्तर तामिळनाडू परिसरातील ३० मतदारसंघांत कोणाला निवडून द्यायचे, हे या समुदायाच्या हाती आहे. त्यामुळे या समाजाला चुचकारण्यासाठी सर्वच पक्षांनी पायघड्या घातल्या आहेत. (‘Waniyar’ power in the 30 constituencies in tamil nadu)

अण्णा द्रमुकशी आघाडी केलेला एस. रामदास यांचा पीएमके या समुदायाचे नेतृत्व करीत आला आहे. पीएमके २३ जागा लढवीत असून, त्यातील बहुतांश जागा उत्तर तामिळनाडूतील आहेत. तिथे विरोधी पक्षांना विजयासाठी कसरत करावी लागेल.  निवडणुकीच्या तोंडावरच वणियार समुदायाला शिक्षण व नोकरीत साडेदहा टक्के आरक्षण देऊन अण्णा मांड पक्की केल्याचे मानले जाते. गेल्या निवडणुकीत सर्व २३४ ठिकाणी उतरूनही पीएमकेला एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र, साडेपाच टक्क्यांपेक्षा जास्त मते घेऊन अनेक मतदारसंघांत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे विजयाचे गणित बिघडविले होते. 

भाजपलाही लाभ
कुख्यात चंदनतस्कर वीरपन्नही वणियार समाजाचा होता. सध्या त्याची मुलगी विद्याराणी ही भाजपची पदाधिकारी आहे. विखुरलेल्या वणियार समाजाची मते मिळविण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.

वणियार समाजाचा कल कुणीकडे?
पीएमकेला २०११ मध्ये द्रमुकसोबत आघाडी करूनही तीन जागा मिळाल्या होत्या, मात्र २०१६ साली पक्षाचा आलेख शून्यावर आल्याने यंदा पीएमकेने अण्णा द्रमुककडून २३ जागा मिळवल्या. अर्थात वणियार समाज खरोखर पीएमकेबरोबर आहे का, हे मतदानातून स्पष्ट होईल.
 

Web Title: ‘Waniyar’ power in the 30 constituencies in tamil nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.