पिळ्कोस : कळवण तालुक्यातील पिळकोससह परिसरात काल झालेल्या पहिल्या मुसळधार पावसाने राज्य महामार्ग क्र. १७ वरील गिरणा नदीवरील पिळकोस- बगडू पुलाच्या नुकतेच नवीन डांबरीकरण झालेल्या रस्त्याचा उत्तरेकडील बाजूचा रस्ता व पुलाचा भराव पावसाच्या पाण्याने वाहून ग ...
ओझर : ओझर नगरपरिषदेने विद्युत बिले थकविल्यामुळे महावितरण कंपनीने ओझर गावासह उपनगरातील पथदीप व पाणीपुरवठ्याच्या कनेक्शनचा विद्युत पुरवठा रविवार (दि.२९) पासून खंडित केल्यामुळे संपूर्ण गाव अंधारात बुडाले आहे. विद्युत पुरवठा खंडित केल्याने ओझरसह उपनगराती ...
लोहोणेर : देवळा तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्वाच्या अशा विठेवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रशांत निकम यांची तर व्हाइस चेअरमनपदी समाधान निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
पिंपळगाव बसवंत : गाव, शहर, मंदिर, रस्ते, स्मशानभूमी, गल्ली स्वच्छ करण्यासाठी जय बाबाजी भक्त परिवाराने पुढाकार घेतला असून त्यासाठी १ कोटी २५ लाख ३४ हजार ५६७ तास श्रमदान केले जाणार असल्याची माहिती परिवारामार्फत देण्यात आली. ...
लोहोणेर : धाराशिव संचलित वसाका या कारखान्याच्या ३६ व्या गाळप हंगामाची बुधवारी (दि. ३०) सांगता झाली. या गाळप हंगामात २ लाख २ हजार ५०० मे. टन उसाचे गाळप करण्यात आले. त्यातून १ लाख ९४ हजार क्विंटल साखरनिर्मिती होऊन सरासरी साखर उतारा ९.६० टक्के मिळाला. ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाळनाथ महाराज यात्रेनिमित्त शेवटच्या दिवशी कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात येऊन यात्रेची सांगता झाली. ...
ठाणगाव : सोनांबे विकास सोसायटीची निवडणूक होऊन जनसेवा पॅनलने बारा जागा जिंकून निर्वाचित वर्चस्व स्थापित केले. तर विरोधी समर्थ पॅनलला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले तर एक जागा यापूर्वीच बिनविरोध निवडण्यात आली होती. ...
देवळा : तालुक्यातील वाजगाव, खुंटेवाडी, वाखारवाडी व डोंगरगाव ह्या चार विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी १४५ अर्ज दाखल झाले असून, वाजगाव सोसायटीसाठी सर्वाधिक ५१ उमेदवारी अर्ज दाखल ...