lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > Talathi Bharti; २३ जिल्ह्यांमध्ये एक हजारांहून अधिक जणांची नियुक्ती

Talathi Bharti; २३ जिल्ह्यांमध्ये एक हजारांहून अधिक जणांची नियुक्ती

Talathi Bharati; Recruitment of more than 1000 people in 23 districts | Talathi Bharti; २३ जिल्ह्यांमध्ये एक हजारांहून अधिक जणांची नियुक्ती

Talathi Bharti; २३ जिल्ह्यांमध्ये एक हजारांहून अधिक जणांची नियुक्ती

२३ जिल्ह्यांमधील २,४७९ निवड झालेल्या उमेदवारांपैकी १,४४९ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली होती. त्यातील १,०४४ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे.

२३ जिल्ह्यांमधील २,४७९ निवड झालेल्या उमेदवारांपैकी १,४४९ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली होती. त्यातील १,०४४ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नितीन चौधरी
पुणे : आदिवासीबहुल अर्थात पेसा क्षेत्रातील तलाठी पदांची नियुक्ती निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली आहे. निवडणूक आयोगाने तूर्तास लाल कंदील दाखवला आहे. मात्र, अन्य २३ जिल्ह्यांमध्ये एक हजारांहून अधिक तलाठ्यांची नियुक्ती झाली.

गेल्या वर्षी जूनमध्ये ४ हजार ४६६ जागांसाठी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मात्र, पेसा क्षेत्रातील जिल्ह्यांमधील पद भरतीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने १३ जिल्ह्यांमधील पदांबाबत निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

सर्वाधिक रायगडमध्ये
२३ जिल्ह्यांमधील २,४७९ निवड झालेल्या उमेदवारांपैकी १,४४९ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली होती. त्यातील १,०४४ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. सर्वाधिक १४१ तलाठी रायगड जिल्ह्यात, त्याखालोखाल ११३ सोलापूर जिल्ह्यामध्ये, वर्धेत ६३. नागपूरमध्ये ५३ आहेत.

अमरावती, यवतमाळ, पालघर, गडचिरोली, पुणे, नगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, चंद्रपूर, नांदेड व ठाणे या जिल्ह्यांमधील १ हजार ७०३ उमेदवारांची नियुक्त्ती रखडली आहे.

जिल्हानिहाय नियुक्ती
मुंबई शहर १३
मुंबई उपनगर ३२
रत्नागिरी ५३
सिंधुदुर्ग २४
सातारा ३८
सांगली ४४
कोल्हापूर २१
भंडारा २३
गोंदिया १७
अकोला ३१
बुलढाणा ३६
वाशिम २१
छ. संभाजीनगर ५९
बीड ५५
परभणी ८१
धाराशिव ६४
जालना १६
लातूर १७
हिंगोली २९

अधिक वाचा: कोणत्या क्षेत्रात किती लागवड मिळणार अचूक माहिती; आला 'डिजिटल क्रॉप सर्व्हे'

Web Title: Talathi Bharati; Recruitment of more than 1000 people in 23 districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.