सर्वच कारखान्यांचे वजनकाटे डिजीटल आहेत. मात्र, ऑनलाईन नसल्याने वजनात फेरफार करता येते. यासाठी शासनाने सर्व्हरच्या नियंत्रणाखाली काटे आणले तर छेडछाड निदर्शनास येते. इंडिकेटर वरुनच थेट वजन पावती द्यावी. ...
राज्यात यंदाच्या २०२३-२४ च्या ऊस गाळप हंगामातील ३० एप्रिलअखेर एकूण देय असलेल्या रकमेपैकी ९७.४२ टक्क्यांइतकी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर साखर कारखान्यांनी जमा केली आहे. ...
जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना, क्रांती अग्रणी जी. डी. बापू सहकारी साखर कारखाना व राजारामबापू सहकारी साखर कारखाना कारंदवाडी युनिट या तीन कारखान्यांना ११७ कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली. ...
राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पाचा दोन वर्षाचा कालावधी मार्च २०२४ अखेर संपुष्टात आल्याची बाब विचारात घेऊन सदर प्रकल्प योजनेस आर्थिक वर्ष २०२४-२०२५ या वर्षासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. ...
ऊसदराच्या बाबतीत महाराष्ट्रापेक्षा गुजरात राज्यातील साखर कारखाने कायमच अव्वल असलेले आतापर्यंत दिसून आले आहे. नुकत्याच संपलेल्या उसाची खरेदी किंमत गुजरातच्या कारखान्यांनी जाहीर केली असून, महाराष्ट्रातील कारखानदारांसाठी तो एक प्रकारचा धडाच आहे. ...