मागील वर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सर्वच साखर कारखाने अडचणीत सापडतील असा अंदाज होता. मात्र, हा अंदाज चुकीचा ठरला. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा गाळप हंगाम उत्तम चालला. देशात सर्वाधिक गाळपाचा मान महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीने मिळवला. ...
देशातील साखरेच्या उत्पादनाचा अंदाज आल्याने 'बी हेवी' मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली खरी, पण बंदी असतानाही ज्यांनी तयार करून ठेवले त्यांनाच फायदा होणार आहे. ...
साखरेसह उपपदार्थांना बाजारपेठेत चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची एफआरपी देऊन सर्वच साखर कारखान्यांकडे पैसे जादा शिल्लक राहतात. पण, ते शेतकऱ्यांना दिले जात नसल्याचा गेल्या दोन वर्षातील अनुभव आहे. ...
चालू हंगामात अपेक्षेपेक्षा साखरेचे जादा उत्पादन झाल्याने २० लाख टन साखरेची निर्यात करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी साखर उद्योगाने केली. मात्र, या मागणीला केंद्र सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. ...
राज्य शासन व महाराष्ट्रातील तमाम सहकारी आणि खासगी कारखान्यांच्या शेती विभागाचा अंदाज चुकवून यंदाचा ऊस गाळप हंगाम बुधवारी समाप्त झाला. राज्यात यंदाच्या हंगामात १०७३ लाख टन गाळप झाले असून, ११० लाख टन साखर उत्पादन झाले. ...