राज्यातील साखर कारखाने १५ नोव्हेंबरला सुरु करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतला. त्याची अंमलबजावणी करत साखर आयुक्तांनी वेळेच्या आधी साखर कारखाने सुरू केले तर गुन्हे दाखल करण्याचा सज्जड दम राज्यातील साखर कारखान्यांना दिला आहे. ...
ऐन दिवाळीत घाऊक बाजारात साखरेच्या दरात घसरण झाली असून, प्रतिक्विंटल ३,४५० रुपयांपर्यंत दर खाली आला आहे. त्यामुळे नोव्हेंबर-२०२४ चा विक्री कोटाही कमी झाला आहे. ...
तोडणी मजुरांना साहाय्य करण्यासाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कल्याण महामंडळ स्थापन करण्यात आले. या महामंडळास दरवर्षी प्रतिटनास तीन रुपयांप्रमाणे साखर कारखाने निधी देतात. ...
Us FRP सध्या सर्वत्र निवडणुकीचा माहोल असला तरी अनेक शेतकऱ्यांचे लक्ष साखर कारखाने कधी सुरू होणार, याकडे लागले आहे. यंदाचा ऊस हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, एफआरपी किती मिळणार याची उत्सुकता शेतकऱ्यांना आहे. ...
गळीत हंगाम हा १ नोव्हेंबर ऐवजी १५ नोव्हेंबरला सुरू होणार आहे. त्यामुळे सभासदांचे आडसाली उसास प्राधान्याने तोड देणार आहोत. यावर्षी पर्जन्यमान चांगले असल्याने त्याचाही फायदा ऊस उत्पादक सभासदांना होणार आहे. ...
शहरातील नोकरदारांची दिवाळी ही संकल्पना अलीकडे बदलू लागली असून, ग्रामीण भागातही दिवाळी जोरात होत आहे. दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांच्या हातात दूध, उसाची बिले व साखर कामगारांना मिळणारा पैसा बोनसच्या माध्यमातून येत असतो. ...
साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करणे केंद्र सरकारणे लांबणीवर टाकले आहे. सध्या किरकोळ बाजारात साखरेचा दर ४३ ते ४५ रुपये प्रतिकिलो मिळत असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत दरवाढ लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. ...