वेरूळ येथील जय बाबाजी परिवाराचे प्रणेते श्री श्री १००८ शांतीगिरी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत जालन्यात सोमवारी झालेल्या राजकारणाचे शुध्दीकरण कार्यक्रमाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ...
श्रद्धेने व विश्वासाने केलेल्या कर्माला चांगली गती मिळते. त्याला त्याचे फळ लागते. संशयी मनात विकृती निर्माण होते. संशयी मन कोणताही हेतू साध्य करू शकत नाही. ...
प्रत्येक गोष्टीला कारण असते. विनाकारण कुठलीही कृती ही फुकट वेळ गमविण्याचे लक्षण समजले पाहिजे. साद-प्रतिसाद हा तर निसर्गनियमच आहे. मनुष्य ज्या पद्धतीची कृती करतो, विचार करतो, त्याच प्रकारचे फळ त्याच्या पदरात पडत असतात. ...
भगवद्गीतेतला ८ व्या अध्यायातला २४वा श्लोक आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अग्नी, ज्योती म्हणजे ज्वाळा, दिवस, शुक्लपक्ष, उत्तरायणाचे ६ महिने, यात मेलेले ब्रह्मवेत्ते लोक मेल्यावर ब्रह्मास पोचतात. ...