Nagpur News : 'ती' गाढ झोपत असताना सापाच्या रुपात 'काळ' आला, तिनदा हाताला चावा घेतला. ती घाबरली, बेशुद्ध झाली. मात्र, डॉक्टरांच्या उपचाराने व स्वत:च्या जिद्दीने तिने मृत्यूलाही हरवले व आपल्या चिमुकल्यांसाठी ती मृत्यूच्या दारातून परत आली. ...
महापालिकेत सध्या निवडणुकांचे पडधम वाजायला लागले असल्याने प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवार नागरिकांना शुभेच्छा देण्याासाठी सरसावले आहेत. दसऱ्यानंतर आता दिवाळीच्या शुभेच्छा फलकांनी शहरातील चौकांचा श्वास गुदमरायला लागलेला आहे. ...
८५० प्रकल्पग्रस्तांना जानेवारी २०२२ पासून नोकरी व उर्वरित मोबदला देण्याचे लेखी आश्वासन देऊन वेकोलिने दुर्लक्ष केले. परिणामी, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी गुरुवारी बेमुदत आंदोलन सुरू केले होते. ...
आदिवासी जात पडताळणीचे कार्यालय सहा वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत आहे. अतिशय अडगळीच्या ठिकाणी हे कार्यालय घेण्यात आले असून, आदिवासींना हे कार्यालय शोधताना ‘ढुंढते रह जाओगे’ असा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. ...
पारदर्शक सिलिंडर बाजारात येणार आहे. त्याचा पहिला प्रयोग यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात होणार आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांतही असे सिलिंडर लवकरच पोहोचणार आहेत. ...
स्थानिक नागरिक आणि आदिवासी खदानीविरोधात रस्त्यावर उतरले असून खदानीला विरोध करत असून आज पहाटे एटापल्ली येथे ठिय्या आंदोलनाला बसलेल्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी अचानक अटक केल्याची माहिती मिळाली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व, वैचारिक चिंतन आणि कार्यकर्तृत्व याचे वर्णन करणाऱ्या ‘नरेंद्र’ नामक अनोख्या रागाची निर्मिती गायिका डॉ. रेवा नातू यांनी केली आहे ...
कोरोनात निराधारांच्या अनुदानाला ब्रेक लागल्याने लाभार्थ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आता दोन दिवसांत दिवाळी असल्याने काय करावे? असा प्रश्न लाभार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. ...