स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले. Read More
यूट्यूबवर 'स्मृती इराणींचे मौन तोडा' आणि 'स्मृती इराणींच्या कौटुंबिक भ्रष्टाचाराची गाथा' आणि इंस्टाग्रामवर शेअर केलेला 'हम अखबार भी चलते हैं बदनाम' व्हिडिओ अशा शीर्षकांसह खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात आली आहे. ...
काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी स्मृती इराणींची लेक झोईश इराणी ही मृत माणसाच्या नावावर लाय़सन घेऊन गोव्यात बार रेस्टॉरंट चालवित असल्याचा आरोप केला आहे. ...
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात शिवसेना केंद्रस्थानी आहे. शिवसेनेत उभी फूट पडली, ठाकरे सरकार गेलं. पण याचा केवळ शिवसेनेला किंवा ठाकरेंनाच नव्हे, तर सुप्रिया सुळेंना मोठा धक्का बसला आहे. भाजपाचा नेमका प्लान काय आहे ते समजून घ्या... ...
दिल्लीतील राजेंद्र नगर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 23 जून रोजी मतदान होत आहे. भाजपचे उमेदवार राजेश भाटिया यांच्या समर्थनार्थ स्मृती इराणी रविवारी निवडणूक सभेत सहभागी होणार होत्या. ...