सिद्धार्थ सागरने करिअरची सुरुवात स्टँड अप कॉमेडियन म्हणून केली होती.आज त्याला प्रेक्षक मौसीच्या नावाने ओळखतात. छोट्या पडद्यावरील बऱ्याच कॉमेडी शोमध्ये सिद्धार्थने काम केले आहे. ‘कॉमेडी सर्कस’, ‘लाफ्टर के फटके’, ‘कॉमेडी सर्कस के अजुबे’ यांसारख्या कार्यक्रमांमुळे तो घराघरात पोहोचला. 'कॉमेडी नाइट्स लाईव्ह' या शो दरम्यान भारतीशी भांडण झाल्यानंतर सिद्धार्थला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. एका अॅक्ट दरम्यान सिद्धार्थ भारतीच्या श्रीमुखात मारायची होती. मात्र सिद्धार्थने ती जोरात मारली. कार्यक्रम संपल्यानंतर याची तक्रार भारतीने प्रोडक्शनकडे केली. यानंतर भारती आणि सिद्धार्थने एकमेकांशी बोलणं बंद केले. ‘द कपिल शर्मा शो’मध्येही सिद्धार्थ दिसला होता. ‘सेल्फी मौसी’ या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. Read More