गुजरात राज्यात भाजपाची घसरगुंडी झाल्याने लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते, आमदार दिलीप वळसे यांनी केले. ...
नगर जिल्ह्यात सन २०१७ मध्ये ३१ डिसेंबरअखेर महसूल प्रशासनाने वाळूतस्करांकडून २ कोटी ९३ लाखाचा दंड वसूल केला. यामध्ये सर्वाधिक दंड श्रीगोंदा तालुक्यात ४८ लाख १८ हजार तर सर्वात कमी नेवासे तालुक्यात १ लाख ६८ हजाराचा दंड वसूल केला आहे. ...
नगर-दौंड रोडवर वाळूची ट्रक व मारुती यांच्यात जोरदार धडक होऊन मारुती व्हॅनचा चालक देवीदास बापूराव बनकर (रा. माळवाडी अजनुज, वय ६५) हे जागीच ठार झाले. हा अपघात मातोश्री हॉस्पीटलसमोर गुरूवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झाला. ...
कोरेगव्हाण (ता. श्रीगोंदा) येथे एका वीस वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना सोमवारी (दि. १) घडली. याबाबत बुधवारी (दि़ ३) पीडित तरुणीने बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी एका तरुणास अटक केली आहे. ...
श्रीगोंदा शहरात दशक्रिया विधीच्या वेळी काकस्पर्श होत नसल्याने सत्ताधारी - विरोधकांनी एकत्र येऊन बंधा-यातील पाणी सोडून दिले. शहरातील गोरे मळा बंधा-यातील लाख मोलाचे पाणी सोडून देण्यात आले. ...
श्रीगोंदा तालुक्यातील हंगा नदीवरील विसापूर तलावाच्या मातीच्या भरावाला भेग पडली आहे. जवळपास १०० फुट उभी लांबीची भेग पडली असून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी काल पाहणी केली. ...
श्रीगोंदा बस स्थानकात बसमध्ये बसण्यावरून झालेली वादावादी सोडविण्यासाठी गेलेल्या महिला वाहकाला मारहाण करण्यात आली. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात महिलेसह दोघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...