प्रियकराकडून फसवणूक झाल्याने आलेल्या नैराशातून तरुणीने आत्महत्या केल्याची घटना श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातील शासकीय वसाहतीत २४ जुलै रोजी दुपारी घडली. मात्र या पिडीत तरुणीचा शनिवारी पहाटे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ...
श्रीगोंदा शहर परिसरात शुक्रवारी (२४ जुलै) ढगफुटी झाली. सरस्वती नदीला पूर आला. साळवण देवी रोडवरील सुधाकर रायकर यांच्या कुक्कुटपालनमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने २०० कोंबड्या वाहून गेल्या. एका अपार्टमेंटमधील २४ मोटारसायकली वाहून गेल्या आहेत. ...
दौंड पोलिसांनी मोका लावलेला दरोड्यातील आरोपी १६ जुलै रोजी पहाटे येरवडा जेलमधून पळाला होता. त्यास श्रीगोंदा व पुणे पोलिसांनी सिनेस्टाईलने चार किलोमीटर पाठलाग करुन पकडले. ही घटना कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी शिवारात शुक्रवारी (२४ जुलै) पहाटे घडली. ...
यंदा हंगामाच्या सुरुवातीला धो धो पाऊस बरसल्याने श्रीगोंदा-नगर-कर्जत तालुक्यांच्या हद्दीवरील साकळाई, कोंगजाई डोंगरमाथा हिरवाईने नटला आहे. येथील ओढे-नाले वाहू लागले असून धबधबे कोसळू लागले आहेत. बहरलेला निसर्ग स्थानिक ट्रेकर्स, किल्ले प्रेमींना साद घालू ...
मोटारसायकलवर रस्ता ओलांडत असताना कारची धडक लागून झालेल्या अपघातात मुलगा जागीच ठार झाला. हा अपघात नगर-दौड राष्ट्रीय महामार्गावर सांगवी फाटा येथे शांताई मंगल कार्यालयाजवळ शनिवारी (१८ जुलै) रात्री झाला. ...
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे रविवारी (१९ जुलै) एक कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. दरम्यान, या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. ...