Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
कणकवली तालुक्यातील नाटळ, भिरवंडे, सांगवे गावातील मंदिरांमध्ये श्रावणी सोमवारनिमित्त होणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांवर कोरोनामुळे मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे मंदिरात भाविकांची किरकोळ उपस्थिती दिसून आली. ...
श्रावणातील पहिला सोमवार, पण शिवमंदिर कुलूपबंद. कोरोनाने भाविकांना देवाच्या दर्शनाला जाण्यापासून रोखलं. देव भक्तांच्या, तर भक्त कोरोनाचे संकट दूर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ...
मनमाड : येथुन जवळच असलेल्या नागापूर येथील शेकडो वर्ष पुरातन असलेल्या नागेश्वर महादेव मंदिरामध्ये यंदाच्या वर्षी श्रावण महिन्यात भरणारी यात्रा कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे मंदिर समितीद्वारे रद्द करण्यात आली. त्यामुळे श्रावणातील पहिल्या सोमवारी मंदिर ...
त्र्यंबकेश्वर : श्रावण महिना सुरू झाला की, त्र्यंबकेश्वर नगरी भाविकांच्या गर्दीने अक्षरश: फुलून जायची. त्यातही श्रावणी सोमवारी तर भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी व्हायचीे. यंदा मात्र कोरोनाने भाविकांची वाट रोखली असल्याने त्र्यंबकनगरी ओस पडली आहे. ...
लखमापूर : दिंडोरी तालुका हा धार्मिक व सांस्कृतिक जोपासणारा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात अनेक पुरातन मंदिरे आहे. परंतु कोरोना या साथीच्या रोगाने थैमान घातल्याने तसेच लॉक डाऊनमुळे जमाव बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे ही सर्व मंदिरे आपल्या भक्त ...