छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. Read More
पारंपरिक वाद्यांचा गजर, ‘शिवरायांचा जयजयकार’, घोड्यांसह लवाजमा, मल्लखांबचे प्रात्यक्षिक, शिवशाहीतील प्रसंगांद्वारे प्रबोधनपर संदेश, अशा उत्साही वातावरणात संयुक्त राजारामपुरी यांच्यावतीने शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. सलग तीन वर्षे राजार ...
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पालांदुरात मराठमोळ्या वेशात काढलेली महारॅली आकर्षणाचा केंद्र ठरली होती. अश्वारुढ शिवराय, सोबतीला ५०० मावळे आणि महाराष्ट्रीयन वेशभूषेतील तरुणी यात सहभागी झाल्या होत्या. ...
गोव्यात सरकारी पातळीवरून अनेक वर्षे शिवजयंती साजरी केली जाते. महाराष्ट्रातील वक्त्यांना बोलावून शिवजयंती साजरी केली जात होती पण यावेळी स्थानिक इतिहास अभ्यासकानेच मुख्य शासकीय सोहळ्यावेळी शिवाजींवर व्याख्यान दिले. ...