छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. Read More
रत्नसिंधू योजनेअंतर्गत अथवा जिल्हा नियोजनमधून निधी घेऊन मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महराजांचा नवीन तेजस्वी पुतळा उभारण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतला असून, शिवजयंतीचे औचित्य साधून त्यांनी हा संकल्प केला आहे. ...
शिवजयंती: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. शिवाजी महाराजांबद्दल जाणून घ्यायला प्रत्येक शिवप्रेमींना आवडत असते. शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, पावस नं. १ शाळेतील विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटअंतर्गत जवळील पूर्णगड किल्ल्याला भेट दिली. विद्यार्थ्यांनी पूर्णगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना मा ...