पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ कॉँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही विरोधी पक्षांनी पुकारलेल्या सातारा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सोमवारी सकाळी दैनंदिन व्यवहार सुरु होते. शहरात काही व्यापाऱ्यांनी स्वत:हून दुकाने बंद करुन बंदला प्रतिसाद दिला. ...
वाठार स्टेशन परिसरात जोमात चाललेल्या अवैध दारू, मटका व्यवसामुळे लागलेला बदनामीचा डाग पुसण्यासाठी वाठार स्टेशन पोलिसांनी कंबर कसली. त्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी छापे टाकण्याचा निर्णय घेतला; पण छापे पडण्यापूर्वीच तेथील मुद्देमाल गायब झाला. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली असून, कोयना धरण परिसरात २४ तासांत काहीच पाऊस झाला आहे. तर धरणातून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. दरम्यान, महाबळेश्वर येथे फक्त चार मिलीमीटर पाऊस झालेला आहे. ...
वाघनख्यांची तस्करी करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली, तर अल्पवयीनास ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पाच लाख रुपये किमतीच्या नख्यांसह इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात अनेक दिवस संततधार पाऊस झाल्याने प्रमुख धरणात सद्य:स्थितीत ९६ टक्क्यांच्या पुढे पाणीसाठा आहे. तर कोयनेसह महाबळेश्वर आणि नवजा येथे पाच हजार मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. ...
१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, साताऱ्याच्या प्रतिसरकारचे प्रमुख शिलेदार, क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी सोमवार, दि. १० सप्टेंबर १९४४ ला सातारा जेल फोडून पलायन केले होते. त्याला सोमवारी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. ...
निवडणुकांचे उमेदवारी अर्ज आॅनलाईन पध्दतीने भरले जातात. अर्ज भरण्यासाठी ठराविक मुदत दिलेली असते. मात्र, मुदतीच्या अगदी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सार्वत्रिक मानसिकता निवडणूक यंत्रणेवर ताण आणत असते. ...