संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे. Read More
Rohit Sharma on workload management: भारत-श्रीलंका ( India vs Sri Lanka) यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने पत्रकार परिषदेत अनेक मुद्यांवर मत व्यक्त केले. ...
India vs Sri Lanka: भारत आणि श्रीलंका सीरीजसाठी मागील अनेक दिवसांपासून संघाबाहेर असलेल्या एका धडाकेबाज खेळाडून संधी देण्यात आली आहे. त्या खेळाडूकडून आता मोठ्या खेळाची अपेक्षा आहे. ...
दिल्ली कॅपिटल्सनं उभ्या केलेल्या १५४ धावा सहज पार करता येतील असे राजस्थान रॉयल्सलाच काय, तर सर्वांना वाटले होते. पण, सर्व गणित बदलले अन् दिल्लीनं बाजी मारून गुणतक्त्यात अव्वल स्थान गाठले. ...