पहिल्यांदा डिझेल घेऊन आलेला मोठा टॅँकर या पर्यायी रस्त्यावरून पुढे निघून गेला. त्यामुळे सांगलीहून आलेल्या ट्रक चालकाने धाडस करून या रस्त्यावरील पाण्यात ट्रक घातला. मात्र, रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक पुढील बाजूकडून नदीपात्रातील खड्ड्यात पलटी झाला. ...
चांदोली धरण परिसरात ३० जुलैपासून ११ आॅगस्टअखेर तेरा दिवस अतिवृष्टी झाली होती. त्यावेळीच धरण शंभर टक्के सहज भरले असते. पण मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने धरणाच्या पाण्याचा विसर्ग मोठ्याप्रमाणात ठेवावा लागला. ...
महायुती व्हावी ही सर्वांचीच इच्छा आहे, तरीही आठही विधानसभा क्षेत्रात शिवसैनिकांनी तयारीला लागावे. प्रसंगी स्वतंत्र लढण्याची मानसिकताही बाळगावी, असे आवाहन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. ...
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांपैकी अनेक जागांचे वाटप चर्चेत अडकले आहे. महायुती आणि महाआघाडी यांच्यात अजूनही जागांवरून संभ्रम दिसत आहे. आघाडीचे घटक पक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दलाने मिरजेच्या जागेसाठी आग्रह धरला ...
सांगली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये सिंदगीतील शेतकऱ्याच्या बेदाण्यास किलोला २२१ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. सौद्यासाठी आलेल्या बेदाण्यास सरासरी दोनशे रुपये किलो दर राहिला. ...
महायुतीसाठी अजूनही वाटाघाटी सुरू असल्या तरी युती तुटण्याचीही भीती व्यक्त होऊ लागल्याने शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा, सावध रहा, गाफिल राहू नका, असे संदेश राज्यातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. ...
बुधवारी सायंकाळी अचानकच मिरजेचे संदीप आवटी यांचे नाव समोर आले. भाजपच्या कोअर कमिटीने आवटी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची कुजबूज भाजप नगरसेवकांत सुरू झाली. ...
गेल्या दोन - अडीच वर्षापूर्वी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी काढण्यात आलेली कूपनलिका ग्रामपंचायतीने पाण्याअभावी सोडून दिली होती. परंतु, याच कूपनलिकेतून अचानक सुमारे १५० ते २०० फूट पाणी आकाशात झेपावले. ...