शासनाने सेस निधीत वीस टक्के कपात केल्याच्या निषेधार्थ मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत १९ सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले. सभापती शालन भोई यांनी हे सामुदायिक राजीनामे फेटाळले. ...
आदर्की-फलटण पश्चिम भागातील चार गावांच्या पाणी पुरवठा योजना मुळीकवाडी धरणावर अवलंबून आहेत. मुळीकवाडी धरण आटल्याने चार गावांच्या पाणी पुरवठा योजना धोक्यात आल्या होत्या. संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी बलकवडी कालव्यातून बिबी-मुळीकवाडी ओढ्याला पाणी सोडले. ...
सेतू केंद्रांनी विद्यार्थ्यांकडून विहित शुल्कापेक्षा जास्त पैशाची आकारणी केल्यास तहसिलदारांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी येथे दिले. ...
महिलांमध्ये विविध स्वरूपांतील काम करण्याची मानसिकता असते. ही मानसिकता महिला सबलीकरणाची प्रक्रिया पूर्ण करते; त्यामुळे महिलांना आचार, विचार व्यक्त करणे, उद्योगनिर्मितीबाबत स्वातंत्र्य ...
दिवंगत स्वातंत्र्यसैनिक नामदेवराव कराडकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे येत्या २0 जानेवारी रोजी गौरव सोहळा आयोजित केला असून, यामध्ये लेखक नामदेव माळी यांना सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती ...
हिटलरची आत्मकथा वाचा म्हणून कोणाला सांगितले, तर ती कोण वाचणार नाही. परंतु, त्याचवेळी ‘श्यामची आई’ वाचताना त्याच्या डोळ्यात आपसूकपणे पाणी येईल. ही गोड शब्दातील ताकद आहे. माणसाची सुंदरता बघायची झाली, तर ती त्याच्या विचारात असते, असे पाटील म्हणाले. ...
सांगलीच्या डिझायनर श्रुती दांडेकर यांनी दहा महिन्यांच्या अथक् परिश्रमातून कापडाचे तब्बल २० हजार २८८ तुकडे जोडून शिवराज्याभिषेकाची कलाकृती तयार केली आहे. या कलाकृतीचे सादरीकरण बुधवारी ...