संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
संभाजीराजे छत्रपती यांनी आपण राज्यसभेची निवडणूक अपक्षच लढवणार असे ठरवले होते. मात्र, राज्यातील इतर पक्षाकडून मदत न मिळाल्याने, अखेर त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. ...