सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे. Read More
आजपर्यंत तिने निशिकांत कामत, इम्तियाज अली, प्रकाश झा अशा नावाजलेल्या दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. या दिग्दर्शकांबरोबर काम करण्याचा एक वेगळाच आनंद मिळाला असून यापुढेही अशाच दिग्दर्शकांसह काम करायाला मिळायला हवे असेही तिने सांगितले. ...
१७ मे १९९७ साली नागराजचे सुनीतासह लग्न झाले. अत्यंत साध्या पद्धतीने या दोघांचा विवाह संपन्न झाला. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. यातील एका फोटोत लग्न पार पडल्यानंतर नागराज आणि सुनीता खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. ...
बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींच्या मदतीची चर्चा झाली. पण मराठमोळा अभिनेता देखील गरजूंसाठी काम करताना दिसत आहे. हा अभिनेता आहे लोकप्रिय ठरलेल्या 'सैराट' सिनेमातील सल्या म्हणजे अरबाज शेख. ...