बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. Read More
हैदराबाद हंटर्सने प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या लढतीत दमदार विजय मिळवला. हैदराबादच्या कॅरोलिना मरिन हिने अवध वॉरियर्सच्या सायना नेहवालला १५-५, १५-७ असे पराभूत केले. त्यासोबतच अवध वॉरियर्सच्या पारुपल्ली कश्यप, किदाम्बी श्रीकांत या स्टार खेळाडूंनादेखील या ...
सांध्याच्या दुखापतीतून सावरणारी भारतीय बॅडमिंटन तारका सायना नेहवाल हिने पुढील महिन्यात इंडिया ओपननंतर तीन आठवड्यांच्या ब्रेकदरम्यान पूर्ण तंदुरुस्त होण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. ...
गेल्या काही वर्षांपासून बॅडमिंटनमध्ये भारताने चांगलीच प्रगती केली आहे. सायना नेहवालच्या उदयानंतर पी. व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, बी. साईप्रणीत यांसारख्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंगा अभिमानाने फडकावला. ...
बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशीपचची रौप्य पदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि कांस्य पदक विजेती खेळाडू सायना नेहवाल यांचे संघ शनिवारपासून सुरू होत असलेल्या प्रीमीयर बॅॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) तिस-या सत्रात आमने सामने येतील. या दोन दिग्गजांमध्ये रगणा-या सामन्याची ...
विश्व बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) व्यस्त वेळापत्रकावर स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने टीका केली. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन पाठोपाठ होत असल्याने खेळाडूंकडे जखमांतून सावरण्यास पुरेसा वेळ नसल्याचे सायनाचे मत आहे. ...