प्रबोधनकारांचे नातू सध्या मुख्यमंत्री आहेत. त्यांनी या देवळांना राजकीय मालकीतून मुक्त करायला हवे. राजकारणी तेथे असणे वाईट नाही. मात्र, केवळ राजकारणीच तेथे बसविणे, हा पायंडा चुकीचाच. ...
या जनहित याचिकेवर २३ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. संस्थानचे माजी विश्वस्त उत्तमराव रंभाजी शेळके यांच्या जनहित याचिकेतील दिवाणी अर्जावरील सुनावणीअंती खंडपीठाने हे अंतरिम आदेश दिले आहेत. ...
शिर्डी : राज्यातील प्रमुख देवस्थान असलेल्या साईसंस्थानच्या अध्यक्षपदावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असून हे पद खेचून आणण्याबरोबरच चांगला चेहरा देण्याचे आव्हान या पक्षांसमोर राहणार आहे. एककीडे राजकीय चेहऱ्यांची नावे चर्चेत आहेत, तर दुसरीकडे ...
कोरोनाने कहर पुन्हा सुरू झाल्याने लागू करण्यात आलेल्या मिनी लॉकडॉऊनमुळे शिर्डीत भाविकांची संख्या रोडावली आहे. यामुळे शिर्डीकर पुन्हा हवालदिल झाले आहेत. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिरातील दर्शनाच्या वेळा कमी करण्याबरोबरच गुरूवारची पालखी बंद करण्यात येणार आहे. रात्रीची संचारबंदी विचारात घेऊन पहाटेची काकड आरती व रात्रीची शेजारती भक्तांविना करण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. ...