१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
Mansukh Hiren Murder: मनसुख हिरेन हत्याकांडाचा तपास सध्या NIA कडून सुरु आहे, यात रोज नवनवीन खुलासे समाेर येत आहेत, या हत्याकांडातील सहआरोपी विनायक शिंदेने हत्येच्या दिवशी फेसबुकवर पोस्ट टाकली होती, त्याचा अर्थ NIA टीम शोधत आहे. ...
Sachin Vaze murder ManSukh hiren: अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या संशयास्पद स्कॉर्पिओमधील पत्रात म्हटले होते की, डियर नीता भाभी आणि मुकेश भैय्या आणि कुटुंबीय. हा केवळ ट्रेलर आहे. पुढच्या वेळी तुमच्या कुटुंबाला उडवण्यासाठीचे पूर्ण सामान येईल. सांभाळून र ...
Mukesh Ambani Bomb Scare, Mansukh Hiren Murder: NIA टीमने सचिन वाझे याच्या चौकशीत अनेक धक्कादायक पुरावे गोळा केलेत, मिठीनदीतून अनेक साहित्य जप्त करण्यात आले आहेत, यात बनावट नंबर प्लेटही सापडल्या आहेत. ...
Sachin Vaze: अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्यानंतर सचिन वाझे यांनी मनसुख हिरेनला आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. (Mansukh Hiren Suicide Case) ...
मनसुख हिरेन यांची हत्या (Mansukh Hiren Suicide Case) झाली, त्यावेळी सचिन वाझे (Sachin Vaze) तिथेच उपस्थित होते असा संशय एनआयएला आहे. त्यादृष्टीनं एनआयएनं तपासदेखील केला. त्यात काही धक्कादायक माहिती पुढे येत आहे. ...