१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
Mansukh Hiren Murder: ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास सध्या NIA करत आहे. यात कळवा रेल्वे स्टेशन बाहेर रुमाल विकणाऱ्याचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. ...
Mukesh Ambani Bomb Scare, Mansukh Hiren Murder: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक ठेवल्याच्या प्रकरणी सचिन वाझेला अटक केली. त्यानंतर त्याच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे उघड झाले होते. ...
Param Bir Singh, Sachin vaze, Mumbai Police Commissioner Hemant Nagrale Reports: मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह खात्याला अहवाल दिला आहे. यात परमबीर सिंग आणि सचिन वाझेंबद्दल धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ...
Mukesh Ambani Bomb Scare, Mansukh Hiren Murder: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांड यातील प्रमुख आरोपी सचिन वाझे याचे बाईक रायडिंगचे अनेक फोटो आणि व्हिडीओ प्रसिद्ध झाले आहेत. ...
Crime Recreation of Sachin Vaze in Mansukh Hiren Murder Case: मनसुख हिरेन हत्याकांडाचा तपास करताना NIA टीमनं सचिन वाझेला घेऊन रेल्वे स्टेशनवर क्राईम रिक्रिएशन केले आहे. ...
Mukesh Ambani Bomb Scare: NIA तपासात सचिन वाझेबद्दल धक्कादायक खुलासे येत असताना आता काही अधिकारीही दबक्या आवाजात या प्रकरणावर भाष्य करत आहेत, यात सचिन वाझे आणि डीआयजी दर्जाच्या अधिकाऱ्याचं भांडण तसेच तपासात वाझे दिशाभूल कसे करत होते याचा खुलासा होत आ ...