१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
कुमार केतकर म्हणाले, ‘महाराष्ट्रात घडलेल्या या गुन्ह्यामुळे सगळ्या देशाला स्तब्ध केले. या प्रकरणाची चौकशी व्यवस्थित केली जात नाही. मला एवढेच म्हणायचे की, या प्रकरणात कोणत्या यंत्रणा काम करीत आहेत आणि कोणासाठी व कोणाला लाभ मिळण्यासाठी काम केले जात आहे ...
स्फाेटक कार प्रकरणातील प्रमुख आरोपी वाझे हाच २५ फेब्रुवारीला पांढऱ्या रंगाची इनोव्हा चालवीत होता. मुलंड चेक पोस्ट नाक्यावरून ती मध्यरात्री १.२० वाजेच्या सुमारास गेली होती. वाझे ती चालवीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. ...
जिलेटिन कार प्रकरणी प्रमुख तपास अधिकारी म्हणून वाझेला काेणी, कशासाठी नेमले, त्याबाबत योग्य प्रक्रिया राबविली का, याबद्दलची माहिती ‘एनआयए’ त्याच्याकडून घेणार असल्याचे समजते. येत्या एक-दोन दिवसांत त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली जाण्याची शक्यत ...
गेल्या १३ महिन्यांपासून परमबीर सिंग हे मुंबई आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळत हाेते. अंबानी यांच्या निवासस्थानाजळव सापडलेली स्फाेटक कार, त्यानंतर मनसुख हिरेन यांचे कथित आत्महत्याप्रकरण यावरुन उठलेल्या गदाराेळामुळे परमबीर सिंग अडचणीत आले आहेत. ...
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड २०२०' सोहळ्यात घेतलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटके, मुंबई पोलिस आयुक्तांची बदली आणि सचिन वाझे प्रकरणावर थेट भाष्य केले. ( ...