१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
Sanjay Raut's challenge to BJP : शिवसेना नेते संजय राऊत यांनी सचिन वाझे प्रकरणासंदर्भात मोठं विधान करत विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला जोरदार प्रतिआव्हान दिले आहे. ...
सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्याविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा एटीएसने कोर्टात केला आहे. एटीएसच्या या दाव्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...
Mansukh Hiren : गेल्या अनेक दिवसांपासून रात्रंदिवस एक करून याप्रकरणी न्याय्य पद्धतीने काम केलेल्या माझ्या एटीएस पोलिस दलाच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून अभिवादन करतो. ...
Mansukh Hiren Case : क्रिकेट बुकी असलेल्या गोरने गुन्ह्यासाठी ५ बेनामी सिमकार्ड मुख्य आरोपी सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांना उपलब्ध करून दिले असल्याचं तपासात निष्पन्न झाले आहे. ...
Sharad Pawar on Letter Bomb: परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात केलेल्या गंभीर आरोपामुळे निर्माण झालेली परिस्थिती सावरण्यासाठी स्वत: शरद पवार यांना पुढाकार घ्यावा लागला आहे. ...
ncp chief sharad pawar on timing of param bir singh letter and devendra fadnavis delhi visit: महाविकास आघाडीतल्या नेत्यांशी बोलून देशमुखांच्या राजीनाम्याबद्दलचा निर्णय घेणार ...
Anil deshmukh 100 crore allegation in Sachin Vaze Case: दोन दिवसांपूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सचिन वाझे प्रकरणात उचलबांगडी करण्यात आली होती. यानंतर लोकमतच्या एका कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंगांची बदली अक्ष्यम्य ...
Param Bir Singh Letter: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...