...म्हणून मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट रचला; ATSच्या कोठडी अहवालात धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 07:25 PM2021-03-21T19:25:29+5:302021-03-21T19:31:57+5:30

सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्याविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा एटीएसने कोर्टात केला आहे. एटीएसच्या या दाव्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणात मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना NIA ने अटक केली आहे. तर मनसुख हिरेन (Mansukh Hiren Case) यांच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र एटीएस तपास करत आहे. त्यामुळे सचिन वाझे यांचा ताबा एटीएसला हवा आहे.

त्यासाठी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्याविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा एटीएसने कोर्टात केला आहे. एटीएसच्या या दाव्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

आज कोर्टात एटीएसने तब्बल ४ पानांचा अहवाल दिला असून त्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. NIA कोर्टातून सचिन वाझे यांचा ताबा मिळावा या करता एटीएसने ठाणे कोर्टातून परवानगी देखील मिळवली आहे.

सचिन वाझे यांचा मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणातही हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यातच वाझे यांच्याविरोधात अनेक महत्त्वाचे ठोस पुरावे एटीएसच्या हाती लागले आहेत. सचिन वाझेंचा प्रथम दर्शनी हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा करण्यात येत आहे. एटीएसचे अधिकारी शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु असून अनेक जबाब देखील घेण्यात आले आहेत.

मनसुख हिरेन प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलेला पोलीस विनायक शिंदे (५१) आणि बुकी असलेला नरेश गोर (३१) याला महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. त्यानंतर आता राज्याच्या एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी फेसबुक पोस्ट करून अत्यंत संवेदनशील मनसुख हिरेन खून प्रकरणातील गुंता सुटला असल्याची माहिती दिली आहे.

शिवदीप लांडे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रात्रंदिवस एक करून याप्रकरणी न्याय्य पद्धतीने काम केलेल्या माझ्या एटीएस पोलिस दलाच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून अभिवादन करतो. माझ्या पोलिस कारकीर्दीची आजपर्यंतची ही सर्वात जटिल घटना होती. असे नमूद केले आहे. सचिन वाझे यांचा ताबा एटीएसला हवा आहे. त्यासाठी सचिन वाझे यांच्याविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा एटीएसने कोर्टात केला आहे. एटीएसच्या या दाव्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ATS च्या कोठडी अहवालात स्फोटकांनी भरलेली गाडी संबंधीच मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली असावी, असं नमुद केले आहे. मनसुख यांना कटा व्यतिरिक्तची माहिती कळाली होती. त्यामुळेच त्यांची हत्या करण्याचा कट रचला गेला. पण, त्यांच्या मृत्यू ही आत्महत्या दाखवण्याचा कट होता. पण, त्यांची हत्या कशी केली त्याकरता काय केले हे गुढ अजूनही कायम आहे.

NIA च्या अटकेत असलेल्या सचिन वाझे वापरत असलेल्या एका पेक्षा एक आलिशान गाड्या पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. कारण एका साधारण API म्हणजेच सहाय्यक पोलीस निराक्षकाकडे एवढ्या महागड्या गाड्या आल्याच कशा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. NIA ने आतापर्यंत सचिन वाझे वापरत असलेल्या ५ गाड्या जप्त केल्या आहेत.