१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण - वाझे याने एस. एस. गावडे या नावाच्या आधारकार्डचा हवाला देऊन हॉटेलात मुक्काम केला. त्या कार्डवर त्याचा फोटो होता. त्यामुळे त्याने बनावट कार्डही बनविली असल्याचे उघड झाल्याचे सांगण्यात आले. ...
Mansukh Hiren Murder: खुनाचा तपास सध्या एटीएसकडेच, गेले काही दिवस या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएसचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवदीप लांडे आणि उपायुक्त राजकुमार शिंदे हे ठाण्याच्या कार्यालयात तळ ठोकून आहेत. ...
Param Bir Singh Letter: भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ...
Sachin Vaze case nia and ats have call conversation of mansukh hiren: २५ फेब्रुवारीला मनसुख यांची कार अंबानींच्या घराबाहेर सापडल्यानंतर २७ फेब्रुवारीला मनसुख यांचा भावाशी संवाद ...