१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
Param Bir Singh Letter: या एकूण प्रकरणांचे देशभरात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. सोमवारी लोकसभेतही यावर गदारोळ झाला. भाजपकडून नवनवीन गोष्टींचे दावे आणि खुलासे करण्यात येत आहेत. ...
पवारांच्या दाव्यानंतर आता अनिल देशमुखांसदर्भात, काही डॉक्युमेंट्स समोर आले आहेत. यावरून, या काळात अनिल देशमुख यांनी चारटर्ड विमानाने प्रवास केल्याचे दिसते. यानंतर अनिल देशमुखांनी एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत स्पष्टीकरण दिले आहे. ...
Param bir Singh will Expose soon By NCP: नवाब मलिक यांनीदेखील देशमुख पोलीस अधिकाऱ्याला भेटल्याचे आणि पत्रकार परिषद घेतल्याचा भाजपाचा आरोप फेटाळून लावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार आरोप करत आहेत, ते खोटे आहेत. ...
Sachin Vaze, Param Bir Singh: परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्यासह पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभय देण्याचा निर्णय घेतला ...
या प्रकरणाचे धागेदोरे गुजरातपर्यंत पोहोचले आहेत. वाझेला पूर्ण सहकार्य करणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यालाही या गुन्ह्याची माहिती असू शकते, हे नाकारता येत नाही ...