१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी २ कोटी, परिवहन मंत्री अनिल परब यांनी एका कंपनीकडून ५० कोटी, तर मुंबईच्या ५० ठेकेदारांकडून २ कोटी वसूल करण्यास सांगितले होते, असा सनसनाटी आरोप वाझेने केला आहे. ...
Sachin Vaze Letter : माझा या दोन्ही विषयाशी काहीही संबंध नाही. माझ्या आडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्याचा हा डाव आहे. याप्रकरणातून सरकारची आणि माझी बदनामी भाजपाकडून बदनामी करण्यात येत आहे. ...
Anil Parab On Sachin Vaze Letter: 'एनआयए'कडून अटक करण्यात आलेले मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मीडियाला एक पत्र लिहून राज्यातील तीन महत्वाच्या व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. ...