Anil Deshmukh: "माजी गृहमंत्री देशमुख यांनी मागणी नाही, तर वसुलीबाबत केली चौकशी"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 03:27 AM2021-04-08T03:27:47+5:302021-04-08T03:28:24+5:30

सहायक पाेलीस आयुक्तांचा जबाब; पत्राबाबत उपस्थित झाले पश्नचिन्ह

Anil Deshmukh: "Former Home Minister Deshmukh did not demand, but inquired about the recovery" | Anil Deshmukh: "माजी गृहमंत्री देशमुख यांनी मागणी नाही, तर वसुलीबाबत केली चौकशी"

Anil Deshmukh: "माजी गृहमंत्री देशमुख यांनी मागणी नाही, तर वसुलीबाबत केली चौकशी"

googlenewsNext

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दर महिन्याला १०० कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपावरून खळबळ उडाली आहे. त्यातच आता सिंग यांच्या पत्रातील व्हॉट्सॲप संवादात उल्लेख असलेल्या पोलीस उपायुक्त (अंमलबजावणी) डॉ. राजू भुजबळ आणि सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या जबाबामुळे या पत्राबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यात देशमुख यांनी मागणी नाही तर वसुलीबाबत चौकशी केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

सिंग यांनी मुख्यमंत्र्यांंना लिहिलेल्या पत्रात गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या चॅटचा समावेश आहे. मात्र, त्यांचे चॅट आणि गुन्हे शाखेच्या सहआयुक्तांना दिलेल्या जबाबात तफावत दिसून आली. देशमुख यांनी मुंबईतील १,७५० बार, रेस्टॉरंटकडून प्रत्येक ३ लाख रुपये जमा करण्यास वाझेला सांगितल्याचा चॅटमध्ये उल्लेख होता. मात्र, पाटील यांनी २२ मार्च रोजी दिलेल्या जबाबानुसार १ मार्चला ठाणे हुक्का पार्लरबाबत अधिवेशनात उपस्थित तारांकित प्रश्नाबाबत मुंबई शहराची माहिती घेऊन ब्रीफिंगसाठी मी देशमुख यांच्या शासकीय निवासस्थानी इतर पोलीस अधिकाऱ्यांसाेबत भेटलो. त्याव्यतिरिक्त या कालावधीत किंवा यापूर्वी देशमुख यांच्यासोबत भेट किंवा चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे वाझे व माझी कार्यालय आवारात भेट झाली असता, वाझेने देशमुख यांना तपासाच्या ब्रीफ़िंगसाठी भेटल्याचे सांगितले. दरम्यान देशमुख यांनी १,७५० बार आणि रेस्टॉरंटकडून प्रत्यक्ष ३ लाख रुपये जमा होत असल्याची माहिती मिळाल्याची विचारणा वाझेकडे केल्याचे सांगितले. पण वााझेने देशमुख यांची प्रत्यक्ष भेट झाली किंवा नाही हे मला माहिती नाही, असे जबाबात म्हटले आहे.

तिघांची एकत्र बैठक झालीच नाही!
पोलीस उपायुक्त राजू भुजबळ आणि संजय पाटील हे ४ मार्च २०२१ रोजी अनिल देशमुख यांच्या ‘ज्ञानेश्वरी’ बंगल्यावर त्यांना भेटल्याचा उल्लेख सिंग यांनी केला होता. मात्र, या तिघांची एकत्र बैठक झाली नसल्याचा जबाब या दोन्ही अधिकाऱ्यांनी नाेंदवला.
४ मार्च रोजी आपण अधिवेशनाच्या ब्रीफिंगसाठी देशमुख यांना ज्ञानेश्वरी येथे भेटलो, तेव्हा पाटील तिथे नव्हते, मी बाहेर पडताना दारात मला पाटील भेटल्याचे भुजबळ यांनी सांगितले. 
nतसेच यावेळी देशमुख यांचे स्वीय सचिवांना आस्थापनाबाबतच्या माहितीत तथ्य नसल्याचे सांगितल्याचेही पाटील यांनी जबाबात नमूद केले आहे.
 

Web Title: Anil Deshmukh: "Former Home Minister Deshmukh did not demand, but inquired about the recovery"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.