परतीचा मुसळधार पावसामुळे उजनी परिसरात रविवारी रात्रीत चक्क ९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने उजनीतून एक लाख क्युसेक विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात आला आहे. ...
जायकवाडी धरणातून पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्याने परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्याचे सर्वच्या सर्व २० दरवाजे रविवारी दुपारी उघडण्यात आले. परिणामी गोदावरी नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. ...
लातूर जिल्ह्यात शनिवारी मुसळधार पाऊस पडला. जिल्ह्यातील सात महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. शिल्लक राहिलेली शेतीपिके मातीमोल झाली आहेत. दरम्यान, औराद शहाजानी परिसरातून वाहणाऱ्या तेरणा व मांजरा या दोन्ही नद्यांना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पूर आला. ...