झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चालेचा तिसरा सीझन २२ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेत अण्णांच्या निधनानंतरचा काळ दाखवण्यात आला होता तर दुसऱ्या भागात अण्णा त्यांच्या तरुणपणी कसे होते हे पाहायला मिळाले. आताच्या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अण्णा आणि शेवंता यांना पाहायला मिळणार आहेत. रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक कलाकार या तिसऱ्या भागात दिसणार आहेत. तसेच काही नवीन कलाकारांची देखील या तिसऱ्या भागात एंट्री होणार आहे. Read More
Ratris Khel Chale 3: ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील थरार, रहस्य या सगळ्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'शेवंता' परत येणार असल्याचे संकेत खुद्द 'शेवंता'नं म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनं दिले होते. ...