निमित्त होते, रमजान ईदच्या विशेष सामुहिक नमाजपठण सोहळ्याचे. बुधवारी (दि.५) ऐतिहासिक शहाजहांनी ईदगाह मैदानावर अभूतपुर्व उत्साहात पारंपरिक पध्दतीने खतीब-ए-शहर हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली नाशिककर समाजबांधवांनी ईदचे नमाजपठण केले. ...
पुण्यकर्म व उपासनेसोबत मानवतेची शिकवण देणारे पर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘रमजान’चे २९ दिवस पूर्ण झाले. मंगळवारी कुठल्याही प्रकारचे ढगाळ हवामान नसल्यामुळे काही उपनगरांमध्ये संध्याकाळी स्पष्ट चंद्रकोर मुस्लीम बांधवांना बघता आली. ...