दुष्काळ निवारणासाठी दुवा : ईदगाह मैदानावरून पर्जन्यवृष्टीसाठी ‘अल्लाह’च्या दरबारी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:54 AM2019-06-05T11:54:47+5:302019-06-05T12:04:28+5:30

निमित्त होते, रमजान ईदच्या विशेष सामुहिक नमाजपठण सोहळ्याचे. बुधवारी (दि.५) ऐतिहासिक शहाजहांनी ईदगाह मैदानावर अभूतपुर्व उत्साहात पारंपरिक पध्दतीने खतीब-ए-शहर हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली नाशिककर समाजबांधवांनी ईदचे नमाजपठण केले.

Link for Drought Relief: Goddess Rally from Eidgah Grounds for Rainfall | दुष्काळ निवारणासाठी दुवा : ईदगाह मैदानावरून पर्जन्यवृष्टीसाठी ‘अल्लाह’च्या दरबारी साकडे

दुष्काळ निवारणासाठी दुवा : ईदगाह मैदानावरून पर्जन्यवृष्टीसाठी ‘अल्लाह’च्या दरबारी साकडे

Next
ठळक मुद्देअबालवृध्द मोठ्या संख्येने ईदगाह मैदानावर उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी सोबत छत्री, पाण्याच्या बाटल्या बाळगल्याचे चित्रदरूदोसलामचे उपस्थितांकडून सामुहिकरित्या पठण सुरक्षेच्या कारणास्तव धातुशोधक यंत्राने तपासणी

नाशिक : ‘ऐ अल्लाह जहां सुका गिरा हैं, वहा अपना खुसुसी फज्ल नाजील फरमा, नफा देणेवाली अब्रे रहमत का नुजूल फरमा’, ‘हमारे मुल्क में अम्न-ओ-अमान अता फरमा, और किसान खेत खुशहाली से भर दे, मौला जल्द से जल्द बारीश का नुजुल फरमा दें’ अशा शब्दांत ‘ईद-उल-फित्र’च्या औचित्यावर शहरातील शहाजहांनी ईदगाह मैदानावरून हजारो मुस्लीम बांधवांनी सर्वश्रेष्ठ ‘अल्लाह’च्या दरबारी समाधानकारक पर्जन्यवृष्टी राष्ट्रीय एकात्मता अखंडितपणे जोपासली जावी, यासाठी खास दुआ मागितली.

नमाजपठणानंतर इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर अधारित दरूदोसलामचे उपस्थितांकडून सामुहिकरित्या पठण करण्यात आले. यावेळी मैदानाभोवती चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नमाजपठणासाठी येणा-या नागरिकांची सुरक्षेच्या कारणास्तव धातुशोधक यंत्राने तपासणी करण्यात येत होती. सोहळ्याचे प्रमुख सुत्रसंचालन हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनी केले. समाजबांधवांना ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा देण्यासाठी महापौर रंजना भानसी, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गीते, माजी खासदार समीर भुजबळ, नगरेसवक हेमलता पाटील, सुहास फरांदे, जगदीश गोडसे, राजेंद्र देसाई, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, उपयुक्त लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे, पौर्णिमा चोगुले-श्रींगी आदि मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Link for Drought Relief: Goddess Rally from Eidgah Grounds for Rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.