नाशिकमध्ये चंद्रदर्शन : उद्या साजरी होणार रमजान ईद; सकाळी नमाजपठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 08:49 PM2019-06-04T20:49:16+5:302019-06-04T20:52:17+5:30

पुण्यकर्म व उपासनेसोबत मानवतेची शिकवण देणारे पर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘रमजान’चे २९ दिवस पूर्ण झाले. मंगळवारी कुठल्याही प्रकारचे ढगाळ हवामान नसल्यामुळे काही उपनगरांमध्ये संध्याकाळी स्पष्ट चंद्रकोर मुस्लीम बांधवांना बघता आली.

Chandradesh in Nashik: Tomorrow will celebrate Ramzan Id; Namaj read in the morning | नाशिकमध्ये चंद्रदर्शन : उद्या साजरी होणार रमजान ईद; सकाळी नमाजपठण

नाशिकमध्ये चंद्रदर्शन : उद्या साजरी होणार रमजान ईद; सकाळी नमाजपठण

googlenewsNext
ठळक मुद्देईदगाह मैदानावर सकाळी १० वाजता नमाजपठणाचा सोहळा महिनाभर निर्जळी उपवास

नाशिक :मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाची चंद्रदर्शन घडल्याने मंगळवारी (दि. ४) संध्याकाळी सांगता झाली. बुधवारी (दि.५) शहरासह जिल्हाभरात सर्वत्र ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली जाणार आहे. शहरातील शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर सकाळी १० वाजता पारंपरिक पद्धतीने सामूहिक नमाजपठणाचा सोहळा पार पडणार असल्याचे शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी अधिकृतरित्या विभागीय चांद समितीच्या बैठकीत जाहीर केले.
पुण्यकर्म व उपासनेसोबत मानवतेची शिकवण देणारे पर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘रमजान’चे २९ दिवस पूर्ण झाले. मंगळवारी कुठल्याही प्रकारचे ढगाळ हवामान नसल्यामुळे काही उपनगरांमध्ये संध्याकाळी स्पष्ट चंद्रकोर मुस्लीम बांधवांना बघता आली. याबरोबरच रमजान पर्वाची सांगता होऊन पुढील उर्दू महिना शव्वालची १ तारीख मोजली गेली. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी तत्काळ शाही मशिदीमधून चंद्रदर्शन घडल्याने ईद साजरी क रण्याची घोषणा केली. चंद्रदर्शन घडल्यामुळे ईद साजरी करण्याविषयीचा संभ्रम दूर झाला. इस्लामी कालगणनना नुतन चंद्रदर्शनावर अवलंबून असल्यामुळे चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. रमजान पर्व काळात मुस्लीम बांधवांनी महिनाभर निर्जळी उपवास करत अल्लाहची उपासना (इबादत) केली. यावर्षी संपुर्ण रमजान पर्व मे महिन्यात उन्हाच्या तीव्रतेत पार पडले तरीदेखील अबालवृध्दांचा उत्साह तितकाच पहावयास मिळत होता.शाही मशिदीतून चंद्रदर्शनाची घोषणा होताच उपस्थितांनी एकमेकांना ‘चांद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या. याबरोबरच ‘तरावीह’च्या विशेष नमाजपठणाचाही मंगळवारी समारोप करण्यात आला. जे समाजबांधव मागील दहा दिवसांपासून तसेच महिनाभरापासून मशिदीत मुक्कामी थांबलेल्या नागरिकांना सन्मानाने आदरपुर्वक कुटुंबीयांकडून घरी आणले गेले व त्यांचे जय्यत स्वागत केले गेले.
----
‘ईद’ हा आनंदाचा सण असून या दिवशी सर्वांनी एकमेकांना अलिंगण देऊन आपल्या नात्यांची वीण अधिकाधिक घट्ट करावी. पवित्र रमजान पर्व आमच्यापासून आताच निघून गेला. या पर्वात सर्वांनी सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या दरबारी मानवाच्या कल्याणासाठी तसेच देशाची एकता व प्रगतीकरिता विशेष दुवा मागितली. आपला भारत उत्तरोत्तर प्रगती करत आहे, व ही प्रगती अशीच पूढेही होत राहो, यासाठी आपण एकदिलाने परिश्रम घेत योगदाने द्यावे. आपला समाज, शहर आणि देशाला बळकट करण्यासाठी आपल्या प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. ईदच्या दिवशी मनात कोणाचाही द्वेष बाळगू नये.
- हाफीज हिसामुद्दीन अशरफी, शहर-ए-खतीब


सायंकाळी बहरली बाजारपेठ
शुक्रवारी संध्याकाळी समाजबांधवांनी एकमेकांना ‘चांद मुबारक’ अशा शुभेच्छा दिल्या. दरम्यान, संध्याकाळी जुने नाशिक परिसरातील चौक मंडई, शहीद अब्दुल हमीद चौक, भद्रकाली, मेनरोड, रविवार कारंजा आदी परिसरातील बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली होती. रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी कायम होती. या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. खरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडल्याने बाजार फुलला होता. सुकामेवा, नवीन कपडे, पादत्राणे, मेहंदी, अत्तर, टोपी, सुरमा आदींना मागणी वाढली होती.

ईदगाह मैदान सज्ज
नमाजपठणाच्या सोहळ्यासाठी ईदगाह मैदान सज्ज करण्यात आले आहे. संध्याकाळी चंद्रदर्शन घडताच ईदगाहचे दोन्ही प्रवेशद्वार पोलिसांकडून बंद करण्यात आले होते. मैदानाचा ताबा पोलिसांकडून घेण्यात आला होता. मैदानावर रात्रीपासूनच चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मैदानाचे सपाटीकरण करून दोन्ही बाजूला पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: Chandradesh in Nashik: Tomorrow will celebrate Ramzan Id; Namaj read in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.