सरकारच गुन्हेगार असल्याने येत्या २० आॅक्टोबरला बलिप्रतिपदेदिवशी सरकारविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी राज्यभरात पोलीस ठाण्यांवर शेतक-यांचे मोर्चे काढण्याचा निर्धार येथील शेतकरी कर्जमुक्ती परिषदेत करण्यात आला. ...
‘राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, या दोघांच्याही छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला मी लावला. ही आमचीच लेकरे असली तरी ती धंदेवाईकपणे वागू लागली आहेत,’ अशी टीका माजी आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेस किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत केली ...
भाजपाच्या सहकार्यामुळे मिळालेले खासदारपद राजू शेट्टी यांनी आधी सोडावे, मग मीदेखील राज्यमंत्रीपद सोडेन, असे आव्हान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिले. ...
खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य सरकारला दिलेला पाठिंबा सोमवारी काढला. तसे पत्र शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून दिले. शेट्टी यांच्या पक्षाचा एकही विधानसभा सदस्य नाही. ...
विदर्भातील शेतकरी नेतृत्वविहीन झाले आहेत. दुष्काळी स्थिती, नापिकी, कर्जमाफीचा बोजवारा, वाढत्या आत्महत्या असे अनेक मुद्दे आहेत; पण ते हाती घ्यायला नेताच नाही! उत्तम बांधणी केल्यास ‘स्वाभिमानी’ विदर्भात प्रभाव निर्माण करू शकते. ...