शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत. Read More
बॉलिवूड चित्रपटांना कमाईच्या बाबतीत गेल्या काही वर्षापासून साउथ चित्रपटांचा मोठा सामना करावा लागत आहे. हिंदीमध्ये डब झालेल्या साउथ चित्रपटांना टीव्ही वर तर अगोदरपासूनच खूप प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र बॉक्स आॅफिसवर या चित्रपटांची बक्कळ कमाई होणे हे वि ...
रजनीकांत यांनी गेल्यावर्षी राजकारणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच ते भाजपात जाणार असल्याचीही संघासह अनेक भाजपा नेत्यांकडून वक्तव्ये होत होती. ...
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतची मुलगी सौंदर्या आज विशगन वानागमुदीसोबत लग्नबेडीत अडकणार आहे. नुकतीच त्यांची प्री वेडिंग पार्टी व संगीत सोहळा पार पडला. ...
साऊथ मेगास्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांत उद्या ११ फेब्रुवारीला उद्योगपती विशगन वनन्गमुंदीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. या लग्नाचे विधी सुरु झाले आहेत. तूर्तास सौंदर्याच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर धूम करताहेत. ...
अखेर तर्कवितर्कांना पूर्णविराम देत रजनीकांतची मुलगी सौंदर्या रजनीकांत दुसऱ्या लग्नासाठी तयार आहे. होय, याच महिन्यांत येत्या ११ फेब्रुवारीला सौंदर्या उद्योगपती विशगन वनन्गमुंदीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. ...